Posts

Showing posts from April, 2020
आत्मस्वरूप आवरण      पण तुम्ही स्वतःच्याच ठिकाणी अढळ रहा. हे तुम्ही पक्के लक्षात ठेवा की ज्ञानाची जागा अज्ञानाच्याच पंक्तीत आहे. अज्ञानाच्या शेजारीच ज्ञानाचे पान मांडलेले आहे. त्यामुळे अज्ञानाचा आणि ज्ञानाचाही निर्वाह होतो आहे. या दोघांचाही निर्वाह कल्पनेच्या पक्वांनामुळेच होत आहे. आपण ही कल्पनामय पक्वान्ने जेवायला वाढत आहे आणि ज्ञानवृत्ती त्याचा फडशा पाडीत आहे. दोघांचेही जीवन त्यावरच आधारलेले आहे. म्हणून ज्ञान आणि अज्ञान हे एकाच पंक्तीत राहणारे असून तुम्ही त्याच्या पलिकडले आहात. तुमच्या दृष्टीने हे दोन्ही सारखेच असू द्या. ते म्हणजे तुम्ही नव्हे, तर ते सुद्धा तुमच्या ठाई निर्माण झालेले एक आवरण आहे. हे आवरण तुम्हाला झाकून बसते, ते तुम्हाला स्वतःचीच ओळख होऊ देत नाही. अज्ञान हे घट्ट आवरण आहे तर ज्ञान हे झिरझिरीत आवरण आहे,हे ओळखून यांना झुगारुन द्या. म्हणजे तुम्ही स्वतःच्या तेजाने स्वतःच प्रगट रहाल.      अज्ञानाला जसे तुम्ही प्रकाशित करता तसेच हा ज्ञानाचा कल्लोळ तो तुमच्याच ठिकाणी उत्पन्न होतो. या ज्ञानाच्या वृत्ती ज्या तुमच्या ठाई उत्पन्न होतात त्यांनाह...
आत्मस्वरूप स्थिती तुम्ही जसे जसे बोलाल तीच खरी श्रुती आहे. कारण तुम्ही सत्स्वरुपाच्या ठिकाणी स्थित आहात. ज्याला परमेश्वर म्हणतात , त्या परमेश्वराची मूळस्थिती म्हणजे तुम्ही स्वतः आहात. तुमच्या पोटीच एका ठिकाणी तुम्ही परमेश्वराचा भाव धारण केला आणि तुम्हीच एका ठिकाणी जीवपणाचा भाव धारण केला. ही सोंगे घेणारे ते तुम्ही आहात. तुम्हीच एका ठिकाणी जीवपण , शीवपण , परमेश्वरपण या तिघांनाही आधारभूत असणारी , अढळ असणारी स्थिती तुम्ही स्वतःच आहात. सत्स्वरुपाच्या ठिकाणी स्थिर असणे म्हणजे स्थिती , तीच ब्रम्हस्थिती , तीच आत्मस्थिती , तीच पराभक्ती होय. सर्वांच्या पलीकडची , सत्स्वरुपाच्या ठिकाणची , जी सहजरितीने विचारांच्या पलीकडील , वृत्तींच्या पलीकडील अशी स्वाभाविक स्थिती म्हणजेच परमस्थिती होय. तिच्याच पाठीमागल्या नंतरच्या आभासस्वरुप असणा - या या बाकीच्या चराचर विश्व आणि विश्व प्रतिपालक म्हणून जे काही आहेत , त्या सर्वांच्या अवस्था होत. या अवस्था आणि ती ब्रम्हस्थिती होय. आत्मस्थिती होय.       स्थिती आणि अवस्था यातला फरक ओळखा. आपल्याच ठायी स्थित असणे ही स्थिती होय. आप...
आत्मस्वरूप ज्ञानस्वरुप      ज्ञान व ज्ञानाचा विचार हे सर्वस्व नव्हे. ही एक पायरी आहे , की ज्याद्वारे आपल्याला स्वस्थळी जाता येते. ज्ञान हा एक मार्ग आहे. या मार्गावरुन चालत आपल्याला इप्सित स्थळी पोहचायचे असते. म्हणून या ज्ञानाचा अभिमान आपल्या ठायी नसो. ही पायरी सुद्धा पायरीच्याच जागी पडून राहणार आहे. हे ज्ञानसुद्धा त्या ज्ञानाच्याच जागी पडून राहणार आहे. आपल्या ठायी ते नाहीत. या विचारांना , या ज्ञानाच्या विचारांना प्रकाशित करणारे , दाखवून देणारे , ते आपण स्वतःच आहोत. हे ज्ञान म्हणजे आपण नव्हेत , पण या ज्ञानाचेही मूळस्वरुप असे ज्ञानस्वरुप आपण आहोत. या विचारांचेही मूळस्वरुप आपण आहोत.      आत्मस्वरुपाचा विचार म्हणजे आत्मस्वरुप नव्हे. ज्ञान म्हणजे ज्ञानस्वरुप नव्हे. ज्ञानस्वरुप तर तुम्ही आहात. हे ज्ञान तुमच्याच ठिकाणी प्रकटते आहे. यांना प्रकट करणारे तुम्ही आहात. हे ज्ञान जसे प्रकट होते तसेच ते तुमच्याच ठाई लय पावते. असे ते ज्ञानस्वरूप तुम्ही आहात हे ज्ञान म्हणजे तुम्ही नव्हे. म्हणून याचे गुलाम होऊ नका. याचा अभिमान व्यर्थ आहे , याचा ...
आत्मस्वरूप मी      अरे , तू स्वतःला ओळख. स्वतःला ओळखशील तर मला ओळखशील. कारण तू आणि मी वेगवेगळे नाहीत. तू स्वतः म्हणून असा काही नाहीच. तू स्वतः म्हणजे मीच एकटा एक. तुझ्या ठिकाणी ‘ तू ‘ म्हणून मीच आहे. या लाटेच्या कणांकणांमध्ये जलरुप म्हणून मीच आहे. मी महासागरच या लाटांच्या रुपाने सर्वत्र प्रगट आहे. म्हणून तू स्वतःचे नामरुपपण बाजूला सारुन स्वतःचे जलरुप ओळख. तू स्वतःचा अभिमान , ज्ञान-अज्ञान , स्वभाव , व्यक्तिमत्व , स्वतः जे जे काही म्हणून बनला असशील ते सर्व काही सोडून दे. म्हणजे मग जो राहील तो एकटा एक मीच राहील. कारण या सर्वांसकट तू स्वतःच्या ठिकाणी ‘ मी ‘ म्हणून जी कल्पना करतोस , ते तुझे व्यक्तिमत्व हेच मुळात खोटे आहे. भासमान आहे. ते खरोखरीचे नाही. आकाशाच्या ठायी जसा निलिमा म्हणून वसतो , तो जसा आभास आहे , तसा माझ्या ठिकाणी हा जो ‘ तू ‘ म्हणून आहे तो म्हणजे निव्वळ आभासच आहे.      एकटा एक मीच आहे. म्हणजे ‘ तू ‘ म्हणून काहीच नाही. एकटा एक मीच आहे. मी सर्वत्र आहे. मीच सर्वांच्या अंतरात प्रगट आहे. मीच सर्वव्यापी असा आहे. माझ्याव...
आत्मस्वरूप अभिमान एखादा माणूस येतो , त्याची व्रते , त्याचे उपवास , त्याच्या तीर्थयात्रा , तो नित्य करीत असलेल्या पूजा-अर्चा , त्याचे भजन , या सर्वांचा मोठा अभिमान तो बाळगत असतो. मोठ्या अभिमानाने तो स्वतःला व्रती , याज्ञीक , पूजा करणारा भक्त , कर्ममार्गी म्हणवून घेत असतो. परंतु ज्याचा तो अभिमान धरतो आहे , ज्यांची गोष्ट तो करीत आहे ; त्या सर्व गोष्टी कोणाच्या सत्तेने घडत आहेत याचा तो विचार करीत नाही. तो स्वतःच जर अस्तित्वात नसता तर कोण ही व्रते , पूजाअर्चा , तीर्थयात्रा , यज्ञयाग करु शकत असता ? कोण नानात - हेचे कार्य , विचार , उपचारधर्म , पाळू शकत असता ? या सर्वांचा आधार कोण आहे ? त्या आधाराला म्हणजे स्वतःलाच तो पाहत नाही. ज्याच्यामुळे त्याला हे सर्व काही करता आले , त्या स्वतःलाच तो ओळखत नाही. तो स्वतःच जर नसता तर कोण बरे या सर्व गोष्टी करु शकत असता ? तो स्वतःच जर नसता तर कोण याचा अभिमान धारण करु शकत असता ? या अभिमानाला धारण करणारा तो या अभिमानापेक्षा निराळा आहे. हा ज्ञानाचा , भक्तीचा , कर्ममार्गाचा अभिमान ; हा प्रपंचाचा , व्यवहारिक कुशलतेचा अभिमान , परमार्थाचा अभि...
आत्मस्वरूप कल्लोळ      हे महासागरा , तुझ्याच पोटी या सर्व लाटा उत्पन्न होत असतात. हा सर्व लहरींचा कल्लोळ तुझ्याच स्वरुपावर विलसत असतो. तुझ्या पोटी मोठमोठ्या पर्वत शिखरांएवढ्या उत्तुंग लाटा जरी उसळल्या तरी त्यांचे उसळणे हे कायम राहणारे नाही. तर अखेर त्या तुझ्यामध्येच विलय पावत असतात. हे महासागरा , तुला सामावून घेणारा तो चिरंतन आहे , या लाटा क्षणिक उत्पन्न होतात आणि क्षणिक नाश पावतात. या लाटांना उत्पन्न करणारा आणि आपल्यात मिळवून घेणारा (विलय पावून घेणारा) तो तू स्वतःच आहेस. म्हणून या भावभावनांना , विचारांना इतकेच नव्हे तर विकारांना , कल्लोळांना तू श्रेष्ठ मानू नकोस. तर ते सर्वकाही तुझेच गुणगान निर्माण करण्यासाठी उत्पन्न झालेले आहेत. त्यातून स्वतःचे स्वरुप पहा , स्वतःचे ऐश्वर्य पहा. तू शांत आहेस , तू निश्चल आहेस. तेच तुझे वास्तविक स्वरुप आहे. तू अखंड राहणारा आहे आणि तुझी अखंडता कधीही भंग न पावणारी आहे आणि या लाटा कशा आहेत ? या लाटा चंचल आहेत , या लाटा क्षणभंगूर आहेत आणि यांचे अस्तित्वही क्षणिक असे आहे. तुझ्या अस्तित्वामुळे यांचे अस्तित्व आहे , तू ज...
आत्मस्वरूप अंकुश      एखादा मनुष्य येतो आणि त्याच्या भक्तीभावाचे गोडवे गात राहतो , माझी भक्ती कशी निर्मळ , माझी भक्ती कशी श्रेष्ठ असे तो सांगत राहतो. स्वतःला भक्त म्हणवतो आणि माझ्या ठिकाणी भक्तीची विपुलता आहे हे दाखवण्यात त्याला धन्यता वाटते. पण त्यावेळी तो हे विसरलेला असतो की ही भक्तीची भावना , ही तरी भावनाच आहे आणि त्याकाळी तो त्या भावनेचा गुलाम झालेला असतो. त्या भावनेच्या तो आहारी गेलेला असतो. त्या भावनेचा त्याच्यावर पगडा बसलेला असतो.       तिचे वर्चस्व त्याच्यावर इतके असते की ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या हत्तीला माहुत आपल्या छोट्या अंकुशाने काबूत ठेवत असतो , त्याप्रमाणे त्याची ही भक्तीची भावना अंकुश , आणि माहुताचे रुप घेऊन त्याच्यावर सत्ता राबवित असते. त्याला आपल्या ताब्यात ठेवीत असते.. काय कामाची अशी ही भक्ती ? तुम्ही स्वतः माहुत व्हा ? तुम्ही तुमच्या हातामध्ये अंकुश ठेवा आणि या भक्तीभावनेच्या हत्तीला आपल्या ताब्यात असू द्या वेगवेगळ्या भावना , कल्पना , विचार , ज्ञान जे जे काही आहे त्याचे तुम्ही गुलाम न होता त्यां...