आत्मस्वरूप


अंकुश

     एखादा मनुष्य येतो आणि त्याच्या भक्तीभावाचे गोडवे गात राहतो, माझी भक्ती कशी निर्मळ, माझी भक्ती कशी श्रेष्ठ असे तो सांगत राहतो. स्वतःला भक्त म्हणवतो आणि माझ्या ठिकाणी भक्तीची विपुलता आहे हे दाखवण्यात त्याला धन्यता वाटते. पण त्यावेळी तो हे विसरलेला असतो की ही भक्तीची भावना, ही तरी भावनाच आहे आणि त्याकाळी तो त्या भावनेचा गुलाम झालेला असतो. त्या भावनेच्या तो आहारी गेलेला असतो. त्या भावनेचा त्याच्यावर पगडा बसलेला असतो. 

     तिचे वर्चस्व त्याच्यावर इतके असते की ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या हत्तीला माहुत आपल्या छोट्या अंकुशाने काबूत ठेवत असतो, त्याप्रमाणे त्याची ही भक्तीची भावना अंकुश, आणि माहुताचे रुप घेऊन त्याच्यावर सत्ता राबवित असते. त्याला आपल्या ताब्यात ठेवीत असते.. काय कामाची अशी ही भक्ती? तुम्ही स्वतः माहुत व्हा? तुम्ही तुमच्या हातामध्ये अंकुश ठेवा आणि या भक्तीभावनेच्या हत्तीला आपल्या ताब्यात असू द्या वेगवेगळ्या भावना, कल्पना, विचार, ज्ञान जे जे काही आहे त्याचे तुम्ही गुलाम न होता त्यांना तुमच्या ताब्यात ठेवा. त्याचे तुम्ही साक्षी व्हा. त्याच्यापेक्षा स्वतःचे निराळे असणारे स्वरुप तुम्ही ओळखा. तुमच्यावर नियंत्रण ठेवणारे हे नव्हेत. तर तुमच्यापोटी निर्माण झालेले आणि अखेर तुमच्यात विलय पावणारे असे हे आहेत.

Comments

Popular posts from this blog