जाणिव सद्विचारांचा प्रभाव आपल्यावर असा पडतो की त्यामुळे आपण विचारांचे खरोखरच अत्युच्च शिखर गाठतो. सद्विचारांनी आपण फार फार उंच होतो. आपली ही उंची म्हणजे आपली स्वाभाविक स्वस्वरुप स्थिती नव्हे. तो आपल्याच पोटी निर्माण झालेला विचारांचा अभिमान असतो. त्याला विचारांचा किंवा ज्ञानाचा अभिमान असे म्हटल्या जात असते. आपल्या ब्रम्हपणाची जाणिव हेच त्याचे अत्युच्च शिखर असते. या जाणिवेचे प्रकाशक तुम्ही असता. ही जाणिव, ही ब्रम्हपणाची जाणिव, हे प्रकाशित करणारे ते तुम्ही असता. ही जाणिव म्हणजे तुम्ही नव्हे. म्हणून तुमच्या ठिकाणी प्रगट असणारी ‘मी ब्रम्ह आहे‘ ही जाणिव, त्या जाणिवेलाही प्रकाशित करणारे ते तुम्ही असता. ही जाणिव तुम्ही प्रकट केली. ही जाणिव तुम्हीच तुमच्यामधे लय करुन टाकणारे आहात. अशारितीने तुम्ही या जाणिवेचे सर्व समर्थ असे जनक आहात. तुम्ही ब्रम्हस्वरुप झालात. महतो महिमान असे महानाहूनही महान असे झालात. ईश्वर, देवदेवता, सर्व प्राणीमात्र खालीच राहिले. खुजेच ठरले तरी या ठिकाणी ती उच्चता तुम्हाला पचवता आली नाही, स्वतःमध्ये जिरवून टाकता आली नाही. म्हणून हे उच्चतेचे एक अजिर्णच तुम्हा...
Posts
- Get link
- X
- Other Apps
विचारांची उंची येथे आहे मी हा कोण? याचा करावा विचार असे ते म्हणतात. सद्गुरू आपल्याला विचार करा असे म्हणतात. ध्यान-धारणा करा, पूजा-अर्चा करा, भक्ती-भजन करा, तिर्थयात्रा, व्रत, उपवास करा असे ते म्हणत नाहीत. तर विचार करा असेच ते म्हणतात. म्हणजे विचाराने आपली आपल्याला ओळख करुन घ्या. आपले रुप आपण आरशामध्ये पाहतो. आपण काळे का गोरे, नकटे का चांगल्या नाकाचे हे आपण आरशामध्ये पाहून आपल्याला उमगतो. नंतर मग तो आरसा आपण बाजूला ठेवून देतो. त्याप्रमाणे विचाराने तुम्ही स्वतःला ओळखा नंतर तो विचार आरशाप्रमाणे बाजूला करता येत नाही तर स्वतः मध्येच मिळवून घ्या. खलील जिब्रानला आपल्या भटकंतीमध्ये एक भटका भेटला. तो प्रवासी खूपच उंच होता, त्या भटक्याला वाटायचे की या जगातील सर्व प्राणिमात्र फार फार खुजे आहेत आणि मी फार फार उंच आहे. हे माझ्या कमरेपर्यंतही येऊ शकत नाहीत एवढे ते खुजे आहेतदिवसेंदिवस तो अधिकच उंच झाला. सर्व वृक्षादिकसुद्धा त्याच्यापेक्षा ठेंगणे ठरले. त्याहूनही तो अधिक उंच झाला. मेघादिकही त्याच्यापेक्षा खालीच राहिले. माझी तुम्हाला हीच विनंती आहे की तुम्ही असे उंच होऊ नका, तसेच खुजेसु...
- Get link
- X
- Other Apps
अभिमान कुणी वैराग्याचा, कुणी भक्तीचा, कुणी ज्ञानाचा अभिमान धरतो. कुणी योगमार्गाचा, कुणी भक्तपणाचा, नानात-हेचे अभिमान नाना लोक धारण करतात. ते जो आनंद त्यातून लुटत असतात तो त्यांच्या अभिमानाचा आनंद असतो. तो त्यांच्या ख-या स्थितीचा आनंद नसतो. कीर्तन करत असताना, कीर्तन ऐकत असताना जो आनंद प्रगटत असतो तो त्या कीर्तनाच्या स्थितीचा आनंद असतो. आत्मस्थितीच्या ठिकाणी तो नाही. तो आत्मस्थितीचा आनंद या सर्व आनंदाचे माहेरघर आहे. शब्द ऐकण्याची जरुर नाही. बोलण्याची जरुर नाही. कोणता स्पर्श घडण्याची जरुर नाही. कोणता रस चाखण्याची गरज नाही. कोणते रुप पाहण्याची गरज नाही. रुप लावण्य दाखवण्याची गरज नाही कोणत्या गंधाची सुद्धा त्याला गरज नाही. असा शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध यांची अपेक्षा न करता जो आनंद आपल्या अंतरी अखंड स्थित आहे, असा तो आनंद आहे. तो आनंद या कीर्तनावाचून, भजनावाचून, श्रवणभक्तीवाचून अंगचाच आहे. त्यासाठी आपल्याला योगाभ्यासाची गरज नाही. प्राण ब्रम्हांडाला नेण्याची गरज नाही. कारण तो आनंद ही एक आपली स्वाभाविक स्थिती आहे. तो प्राप्त करायची गरज नाही कारण आपणच आनंदरुप आहोत. आपण आनंदरुप कसे आ...
- Get link
- X
- Other Apps
विभक्त भक्ती हे भक्ता, हे टिळे-माळे तू कशासाठी लावले आहेस? तू कुणाची यात्रा करुन राहिला आहेस? तू कुणाची भक्ती करुन राहिला आहेस? कुणाचे भजन करतो आहेस? कुणाची ओढ तुला लागली आहे? स्वतःकडे तू कधी पाहशील? स्वतःची ओढ तुला कधी लागेल? स्वतःची भक्ती तू कधी करशील? जर स्वतःची भक्ती तुझ्याकडून घडेल तरच त्या परमेश्वराची भक्ती तुझ्याकडून घडेल कारण तो परमेश्वर तूच आहेस. या सृष्टीमध्ये जी जी नाना योनींची अनेक रुपे आहेत त्या नाना रुपांच्या ठिकाणी असलेला अंतरात्मा तो तू स्वतःच आहेस. तुझे दैवत विठोबा, त्याचा अंतरात्मासुद्धा तू स्वतःच आहेस. हा अनुभव म्हणजे भक्ती होय. त्या सर्वांच्या अंतरात्म्याशी एकरुप असण्याचा जो अनुभव आहे, तो अनुभव म्हणजे त्यांच्याशी विभक्तपण नसणे आणि हीच आहे भक्ती! त्यांच्याशी विलग राहून, दूर राहून, त्यांच्याशी एकरुप न होता, त्या अंतरात्म्याशी मग तो देवाचे असोत, परमेश्वराचे असोत का कोणाचेही असोत; त्यांच्या अंतरात्म्याशी एकरुप होणे हे अपरिहार्य आहे. जर तू तुला एकरुप झालास तरच भक्ती म्हणजे ऐक्य घडेल. हे घडण्यासाठी तू काय करुन राहिलेला आहेस? हा गंध, टिळे लावणे, माळा...
- Get link
- X
- Other Apps
ओळख अरे पाण्या, तुला कसली तहान लागलेली आहे? तुला पिऊन सर्व सृष्टी तृप्त होते. तुला कसली तहान लागलेली आहे? कशासाठी तू हे जप-तप, यज्ञ-यागादी करतोस? शरीराला, मनाला कशासाठी तू जाळून राहिलेला आहेस? कुणाची भक्ती तुला मिळवायची आहे? कुणाचे ज्ञान तुला प्राप्त करायचे आहे? कुणावर तुला प्रेम करायचे आहे? बाबारे, हा तुझा ज्ञानमार्ग, भक्तीमार्ग, तपमार्ग, कर्ममार्ग हा तुझा द्वैत मार्ग म्हणजे खरोखर भ्रममार्ग आहे. श्रममार्ग आहे. यातून भ्रम आणि श्रमच प्राप्त होणार. यांत विश्रांती नाही. म्हणून या सर्व मार्गापासून विश्राम पाव. बाबारे, तो तुझ्या घरातच स्वतः आहे. इतर घरी जाण्याचा काही प्रश्नच नाही. कशाला घरातल्या घरात सारखा फिरतो आहेस? डोळे मिटून तू कोणत्या देवांचे ध्यान करीत आहे? डोळे उघडून स्वतःकडे पहा, त्या देवांचाही देव तू स्वतःच आहेस. हे चैतन्यमय महाप्रभू, तू कोणत्या मार्गाचा उपदेश करतोस? कोणावर प्रेम करायला सांगतोस? ज्याच्यावर प्रेम करायची तू शिकवण देतो तो श्रीकृष्ण परमात्मा तू स्वतःच आहे. जरा पहा, तू परमेश्वरावर प्रेम करण्याची गोष्ट करतो, स्वतःवर प्रेम कधी करशील? ज्याला स्वतःवर प्रेम करता य...
- Get link
- X
- Other Apps
बावनकशी सोनं अरे परमहंसा, एका ठिकाणी बसण्यासाठी तुला काही श्रम करावे लागतात काय? पंखाच्या भरा-या सुटल्या, पंख आपल्यामध्ये लपेटून घेतले. आता विश्राम प्राप्त करुन घेण्यासाठी तुला काही खटपट करावी लागते काय? स्वाभाविकरितीने भरारी सोडून दिले आणि तू एका ठिकाणी बसलास. त्याबरोबर स्वाभाविक असा विसावा तुझ्या ठिकाणी आहेच की! तो कां प्राप्त करुन घ्यावा लागतो? नाही! तो अंगचाच आहे. त्याप्रमाणे ही ब्रम्हस्थिती मूळचीच आहे. ती प्राप्त करुन घ्यावी लागत नाही. प्राप्त करुन घेण्यासाठी काही उठाठेव करावी लागत नाही. उलट उठाठेव सोडणे हेच येथे महत्वाचे आहे. त्यामुळे ध्यानाने ते प्राप्त करणे किंवा ज्ञानाने ते मिळविणे किंवा भक्तीने ती प्राप्त करणे किंवा स्वतःला आत्मा समजून तिच्यापर्यंत म्हणजे परमात्म्यापर्यंत धावण्याची कल्पना करणे किंवा तो प्रेमास्पद आहे त्याच्यावर मी प्रेम केले पाहीजे, त्याने परमात्म्यावर प्रेम केले पाहिजे याची या ठिकाणी गरज नाही. काहीही करण्याची गरज नाही. असे तुम्ही आहात. तुम्हाला तुमच्यापर्यंत येण्याची काही जरुरत नाही. तुम्ही तुमच्या ठिकाणी पहिल्यापासून आहातच. पैलतीरा...
- Get link
- X
- Other Apps
विश्रांती विसावा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? आपल्या पंखाची फडफड तेवढी थांबवावी लागेल! म्हणून या सर्व ज्ञानाच्या, भावभावनांच्या, कल्पनांच्या, फडफडी तुम्ही थांबवल्या म्हणजे तुम्ही स्वतःच विश्रामस्थळ आहात. हे सर्व विचारसुद्धा तुमच्या शरीरामध्ये सामावले जातात. त्या स्थितीमध्ये सुद्धा यांना जागा नाही. म्हणून हीच खरी तुमची अखंड स्थिती. तुमचे पठण, श्रवण, मनन, ध्यान-धारणा, भजन-पूजन, तीर्थयात्रा, गमनागमन, नानात-हेचे जे व्यवहार आहेत; ते या भरा-यांसारखे आहेत. तुम्हाला अखेर यात शिणच येणार. याचा परीणाम म्हणून अखेर थकणे अपरिहार्य आहे. तुमच्या नामसंकिर्णतेचा अभिमान, विद्वत्तेचा अभिमान, बहुश्रृततेचा अभिमान, आचार विचारांचा अभिमान, व्रत उपासनादिकांचा अभिमान, तपसाधनेचा अभिमान, योग तप इत्यादिंचा अभिमान, हा अभिमान अखेर श्रमरुपच ठरतो. यामध्ये विश्राम नाही. यामध्ये तो निर्विकल्प स्थितीचा सहज असा विसावा नाही. त्यासाठी अखेर या भरा-या, या मनाच्या भरा-या शांतच झाल्या पाहिजेत. जेव्हा हे भरारणे थांबणार तेव्हाच त्या शांत होतील . ते थांबवणे तुमच्याच...