Posts

 विभक्त भक्ती हे भक्ता, हे टिळे-माळे तू कशासाठी लावले आहेस? तू कुणाची यात्रा करुन राहिला आहेस? तू कुणाची भक्ती करुन राहिला आहेस? कुणाचे भजन करतो आहेस? कुणाची ओढ तुला लागली आहे?  स्वतःकडे तू कधी पाहशील? स्वतःची ओढ तुला कधी लागेल? स्वतःची भक्ती तू कधी करशील?  जर स्वतःची भक्ती तुझ्याकडून घडेल तरच त्या परमेश्वराची भक्ती तुझ्याकडून घडेल कारण तो परमेश्वर तूच आहेस. या सृष्टीमध्ये जी जी नाना योनींची अनेक रुपे आहेत त्या नाना रुपांच्या ठिकाणी असलेला अंतरात्मा तो तू स्वतःच आहेस. तुझे दैवत विठोबा, त्याचा अंतरात्मासुद्धा तू स्वतःच आहेस. हा अनुभव म्हणजे भक्ती होय. त्या सर्वांच्या अंतरात्म्याशी एकरुप असण्याचा जो अनुभव आहे, तो अनुभव म्हणजे त्यांच्याशी विभक्तपण नसणे आणि हीच आहे भक्ती!  त्यांच्याशी विलग राहून, दूर राहून, त्यांच्याशी एकरुप न होता, त्या अंतरात्म्याशी मग तो देवाचे असोत, परमेश्वराचे असोत का कोणाचेही असोत; त्यांच्या अंतरात्म्याशी एकरुप होणे हे अपरिहार्य आहे. जर तू तुला एकरुप झालास तरच भक्ती म्हणजे ऐक्य घडेल. हे घडण्यासाठी तू काय करुन राहिलेला आहेस? हा गंध, टिळे लावणे, माळा...
 ओळख अरे पाण्या, तुला कसली तहान लागलेली आहे? तुला पिऊन सर्व सृष्टी तृप्त होते. तुला कसली तहान लागलेली आहे? कशासाठी तू हे जप-तप, यज्ञ-यागादी करतोस? शरीराला, मनाला कशासाठी तू जाळून राहिलेला आहेस? कुणाची भक्ती तुला मिळवायची आहे? कुणाचे ज्ञान तुला प्राप्त करायचे आहे? कुणावर तुला प्रेम करायचे आहे? बाबारे, हा तुझा ज्ञानमार्ग, भक्तीमार्ग, तपमार्ग, कर्ममार्ग हा तुझा द्वैत मार्ग म्हणजे खरोखर भ्रममार्ग आहे. श्रममार्ग आहे. यातून भ्रम आणि श्रमच प्राप्त होणार. यांत विश्रांती नाही. म्हणून या सर्व मार्गापासून विश्राम पाव.  बाबारे, तो तुझ्या घरातच स्वतः आहे. इतर घरी जाण्याचा काही प्रश्नच नाही. कशाला घरातल्या घरात सारखा फिरतो आहेस? डोळे मिटून तू कोणत्या देवांचे ध्यान करीत आहे? डोळे उघडून स्वतःकडे पहा, त्या देवांचाही देव तू स्वतःच आहेस. हे चैतन्यमय महाप्रभू, तू कोणत्या मार्गाचा उपदेश करतोस? कोणावर प्रेम करायला सांगतोस? ज्याच्यावर प्रेम करायची तू शिकवण देतो तो श्रीकृष्ण परमात्मा तू स्वतःच आहे. जरा पहा, तू परमेश्वरावर प्रेम करण्याची गोष्ट करतो, स्वतःवर प्रेम कधी करशील? ज्याला स्वतःवर प्रेम करता य...
 बावनकशी सोनं       अरे परमहंसा, एका ठिकाणी बसण्यासाठी तुला काही श्रम करावे लागतात काय? पंखाच्या भरा-या सुटल्या, पंख आपल्यामध्ये लपेटून घेतले. आता विश्राम प्राप्त करुन घेण्यासाठी तुला काही खटपट करावी लागते काय? स्वाभाविकरितीने भरारी सोडून दिले आणि तू एका ठिकाणी बसलास. त्याबरोबर स्वाभाविक असा विसावा तुझ्या ठिकाणी आहेच की! तो कां प्राप्त करुन घ्यावा लागतो? नाही! तो अंगचाच आहे. त्याप्रमाणे ही ब्रम्हस्थिती मूळचीच आहे. ती प्राप्त करुन घ्यावी लागत नाही. प्राप्त करुन घेण्यासाठी काही उठाठेव करावी लागत नाही. उलट उठाठेव सोडणे हेच येथे महत्वाचे आहे. त्यामुळे ध्यानाने ते प्राप्त करणे किंवा ज्ञानाने ते मिळविणे किंवा भक्तीने ती प्राप्त करणे किंवा स्वतःला आत्मा समजून तिच्यापर्यंत म्हणजे परमात्म्यापर्यंत धावण्याची कल्पना करणे किंवा तो प्रेमास्पद आहे त्याच्यावर मी प्रेम केले पाहीजे, त्याने परमात्म्यावर प्रेम केले पाहिजे याची या ठिकाणी गरज नाही. काहीही करण्याची गरज नाही. असे तुम्ही आहात. तुम्हाला तुमच्यापर्यंत येण्याची काही जरुरत नाही. तुम्ही तुमच्या ठिकाणी पहिल्यापासून आहातच. पैलतीरा...
विश्रांती        विसावा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? आपल्या पंखाची फडफड तेवढी थांबवावी लागेल! म्हणून या सर्व ज्ञानाच्या, भावभावनांच्या, कल्पनांच्या, फडफडी तुम्ही थांबवल्या म्हणजे तुम्ही स्वतःच विश्रामस्थळ आहात. हे सर्व विचारसुद्धा तुमच्या शरीरामध्ये सामावले जातात. त्या स्थितीमध्ये सुद्धा यांना जागा नाही. म्हणून हीच खरी तुमची अखंड स्थिती. तुमचे पठण, श्रवण, मनन, ध्यान-धारणा, भजन-पूजन, तीर्थयात्रा, गमनागमन, नानात-हेचे जे व्यवहार आहेत; ते या भरा-यांसारखे आहेत. तुम्हाला अखेर यात शिणच येणार.      याचा परीणाम म्हणून अखेर थकणे अपरिहार्य आहे. तुमच्या नामसंकिर्णतेचा अभिमान, विद्वत्तेचा अभिमान, बहुश्रृततेचा अभिमान, आचार विचारांचा अभिमान, व्रत उपासनादिकांचा अभिमान, तपसाधनेचा अभिमान, योग तप इत्यादिंचा अभिमान, हा अभिमान अखेर श्रमरुपच ठरतो. यामध्ये विश्राम नाही. यामध्ये तो निर्विकल्प स्थितीचा सहज असा विसावा नाही. त्यासाठी अखेर या भरा-या, या मनाच्या भरा-या शांतच झाल्या पाहिजेत. जेव्हा हे भरारणे थांबणार तेव्हाच त्या शांत होतील . ते थांबवणे तुमच्याच...
ज्ञानपंख      अरे राजहंसा, हे विचारांचे, भावभावनांचे पंख तुला आहेत आणि त्यातून ज्ञान आणि भक्तीच्या भरा-या तू मारुन राहिलेला आहेस. या पंखांनी तू गगनाला गवसणी घालशील पण तुला स्वतःपर्यंत येण्यासाठी या पंखांची काही गरज आहे काय? एक भावपंख आणि दुसरा एक ज्ञानपंख उभारुन तू या आकाशात भरा-या मारुन राहिला आहेस. त्यामुळे दमून भागून अखेर तू काय मिळवतो? भरा-या मारुन दमला भागलास, थकलास की अखेर आपल्याच जागेवर येऊन बसतोस आणि आपले पंख आपल्याच शरीरात समेटून घेतो. तेव्हा तुला खरीखुरी विश्रांती मिळते. या पंखांना जेव्हा तू स्वतःतच आवरुन मिटवून घेतो, तेव्हाच खराखुरा तू विश्राम पावतो. जसा भरा-या मारण्याचा आनंद आहे तसा हा ज्ञानाचा, भक्तीचा, भावकल्लोळाचा आनंद आहे. पण या आनंदापेक्षा स्वतःच्या ठाईच असा हा शांत विश्रामभाव आहे की, ज्यामध्ये ते आनंद सुद्धा लय पावून जात असतात.      अशी ही आपली स्वतःची अखंड आत्मस्थिती आहे. या विचारांच्या, भावभावनांच्या भरा-यांनी आपण स्वतःला आकाशात कां झोकून देतो? जसे जसे हे पंख तुम्ही वेगाने हलवाल तसे तसे तुम्ही आकाशात भरकटत जाणार. पण त्या आकाशाला अंत...
अखंड स्थिती      पण तुम्हाला हे माहिती नसते. तुम्ही स्वतःला म्हणत असता की, मी अर्जुन आहे. तुम्ही हे काही ओळखत नाही की, मीच श्रीकृष्ण आहे. तुम्ही स्वतःला शिष्य म्हणवता. परंतु तुम्ही हेच ओळखत नाही की सद्गुरुस्वरुप, आत्मस्वरुप हे मी स्वतःच आहे. सद्गुरुंची ती चूक नसते. तुमच्या ठाई ते सद्गुरु स्वतःला पाहत असतात. पण तुम्ही आपल्या ठाई त्या सद्गुरुला ओळखू शकत नाही. तुम्ही स्वतःला अर्जुन म्हणवता. तुम्ही स्वतःला काहीतरी नामरुपात्मक म्हणवता. उगीचच स्वतःचे एक काल्पनिक व्यक्तिमत्व उभे करता, जे व्यवहार कुशल आहे. परंतु परमार्थदृष्टीने त्याला काहीही किंमत नाही. खरोखर पाहता त्या परमोच्च स्थितीमध्ये काही शिल्लकच राहत नाही. ती स्थिती अखंड आहे, जागती आहे. क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला व्यापूनच भरलेली आहे. तुमच्या अंतरी प्रत्यक्ष प्रगटच आहे.      त्या स्थितीमध्ये तुमचे हे व्यक्तिमत्व म्हणून, तुमचे हे माणूसपण म्हणून, तुमचे हे शरीर म्हणून, मन म्हणून, ज्ञान म्हणून, तुमच्या वृत्ती, भावना, कल्पना, अज्ञान हे काहीही नाही. हे तुमचे व्यक्तिमत्व तुमच्याच ठाई खरोखर नाही. तुमचे अर्जुनपणच...
स्वयं      तुम्ही स्वतः सद्गुरु व्हा. सद्गुरुंचे विचार हे तुमचे स्वतःचेच विचार झाले पाहिजेत आणि ते विचार स्वानुभवानेच होतात. तुमच्या ठाई अनुभव असला तर ते जे विचार व्यक्त करतात, ते विचार तुम्हीसुद्धा व्यक्त करणारचं. विचारांमध्ये कोणताही फरक राहणार नाही. कारण दोन्ही ठिकाणी स्वानुभव सारखाच असणार आहे. सारखा म्हणणेही चूकच आहे. कारण एकालाच दोन्ही ठिकाणी अनुभव प्राप्त झाला असल्याने स्वानुभव हा एकच असतो. ज्याला तो अनुभव प्राप्त झालेला असतो तोही एकटा एकच असतो. अखंड तो एकटा एकच आहे. दुसरा म्हणून कोणीही काहीही नाहीच.      सृष्टीच्या आरंभकालापासून, नव्हे तर सृष्टी नव्हती तेव्हापासून, आणि सृष्टी नाश पावेल तेव्हा; नव्हे तर सृष्टी नाश पावल्यानंतरही तो एकटा एकच आहे. तो म्हणजे तुम्ही स्वतःच आहात. तुम्हीच ही गीता प्रकट केलेली आहे. तुम्हीच ही सर्व उपनिषदे, हे वेद, श्रृती प्रकट केली आहे. तुमचा अनुभव म्हणजेच हे बोल होत, ही अभंगवाणी होय. म्हणून तुम्हीच गीतेमध्ये सांगता की मला शरण ये. हे अर्जुना, मला शरण ये. तुम्ही विसरता की मीच हे सर्व सांगितलेले आहे. ज्याने ही चूक केलेली न...