स्वयं

     तुम्ही स्वतः सद्गुरु व्हा. सद्गुरुंचे विचार हे तुमचे स्वतःचेच विचार झाले पाहिजेत आणि ते विचार स्वानुभवानेच होतात. तुमच्या ठाई अनुभव असला तर ते जे विचार व्यक्त करतात, ते विचार तुम्हीसुद्धा व्यक्त करणारचं. विचारांमध्ये कोणताही फरक राहणार नाही. कारण दोन्ही ठिकाणी स्वानुभव सारखाच असणार आहे. सारखा म्हणणेही चूकच आहे. कारण एकालाच दोन्ही ठिकाणी अनुभव प्राप्त झाला असल्याने स्वानुभव हा एकच असतो. ज्याला तो अनुभव प्राप्त झालेला असतो तोही एकटा एकच असतो. अखंड तो एकटा एकच आहे. दुसरा म्हणून कोणीही काहीही नाहीच.

     सृष्टीच्या आरंभकालापासून, नव्हे तर सृष्टी नव्हती तेव्हापासून, आणि सृष्टी नाश पावेल तेव्हा; नव्हे तर सृष्टी नाश पावल्यानंतरही तो एकटा एकच आहे. तो म्हणजे तुम्ही स्वतःच आहात. तुम्हीच ही गीता प्रकट केलेली आहे. तुम्हीच ही सर्व उपनिषदे, हे वेद, श्रृती प्रकट केली आहे. तुमचा अनुभव म्हणजेच हे बोल होत, ही अभंगवाणी होय. म्हणून तुम्हीच गीतेमध्ये सांगता की मला शरण ये. हे अर्जुना, मला शरण ये. तुम्ही विसरता की मीच हे सर्व सांगितलेले आहे. ज्याने ही चूक केलेली नाही तोच सद्गुरु, तोच श्रीकृष्ण!

Comments

Popular posts from this blog