एकरूपता


हे सागरा, या वाऱ्यामुळे तुझ्यावर कितीही लाटा जरी उसळल्या, तरी त्यामुळे तुझे काय बिघडते? त्यामुळे तुझे काय कमी जास्त होते? त्यामुळे तुला कसले सुख आणि दुःख प्राप्त होते? या लाटांच्या कल्लोळामुळे तुझ्या सागरपणाला कसली बाधा होते? आणि गड्या या लाटांनी तरी तुला सोडून राहावे कोठे? त्यांना आधार तर तुझाच आहे. त्यामुळे कितीही उठू दे या लाटांना! तू तुझ्या सागरपणानेच रहा. स्वतःवर उठलेला लहरीपणाचा, चंचल मनाचा, हा खेळ तू सागरपणानेच पहा. त्या प्रत्येक लहरीत हे सागरा तू स्वतःच भरलेला आहेस. हा तुझा खेळ तूच मांडलेला आहे. तूच रंगवलेला आहे आणि तूच या लहरींच्या रुपाने स्फुरण पावून राहिलेला आहेस. स्फुरणे हा तर तुझ्या सत्स्वरुपाचा स्वभावच आहे. मग ते स्फुरणे तू आपल्याच स्थितीत स्थित असताना खुशाल भोग. भक्तपणाने भोग किंवा देवपणाने भोग. स्वतः तुझ्या विश्वरुप लहरी आणि तू यांच्यात यत्किंचीतही भेदबुद्धी न धरता दीनपणानी आपल्या ऐश्वर्याचा उपभोग घे. कारण विश्वरुपाने तूच स्फुरलेला आहे आणि ते तुझ्याशी एकरुपच आहे.

समाप्त

Comments

Popular posts from this blog