१. आत्मस्वरूप
मोक्ष मेल्यापाठी आम्हांसी होईल।
ऐसे जे म्हणतील अतिमुर्ख।।
दीप गेल्यावरी कैसाजी प्रकाश।
झाकाझाकी त्यास कासयासी।।
जंववरी देह आहे तंववरी साधन।
करूनियां ज्ञान सिध्द करा।।
गृह दग्ध न होता शिंपीजे उदक।
शेखी तो निष्टक काय कीजे।।
आहे मी हा कोण करावा विचार।
म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा।।


आहे मी हा कोण? याचा करावा विचार.
अरे गृहस्था तू कसला विचार करीत आहेस?
या ठिकाणी एकटा एकटा बसून तू कोणाचे ध्यान करीत आहेस?
तू कशाचे चिंतन करीत आहेस?
तू कोठल्या तीर्थाला जाण्याचा विचार करीत आहेस? कोणाची पुजा अर्चा तू करीत आहेस?
तू कशाचा विचार करुन राहिलेला आहे आणि कशासाठी हा एकांतवास पत्करलेला आहे?
या एकांतामध्ये तू कशाची चिंता, कशाची काळजी करतो आहेस?
स्वतःची काळजी तू केली काय? स्वतःची चिंता तुला
कधी पडली काय?
नानात-हेचे जे तुझ्या सहवासामध्ये काही लोक आहेत, ज्यांना तू आपले किंवा परके मानतो; त्यांचा तू विचार करतो आहे का? पण बाबारे, यात तुझ्या ठिकाणी निर्माण होणा-याभावभावनांचा विचार तू कधी करशील?
या तुझ्या ठिकाणी निर्माण होणा-या नाना कल्पनांचा विचार तू कधी करशील?
या तुझ्या ठिकाणी निर्माण होणा-या नानात-हेच्या वृत्ती आहेत, त्या वृत्तींचा विचार तू कधी करशील?

क्रमशः

Comments

Post a Comment

Popular posts from this blog