शब्द तुम्ही शब्दांना अर्थाच्या मर्यादांनी बांधू नका. मग कोणताही शब्द असीम अर्थ प्रगट करण्यास समर्थ आहे, आणि तिच शब्दांची सार्थकता आहे. अर्थाची सीमा नसलेला शब्द सर्व भाव, भावना, विकार, विचार, भाषा यांना आपल्यात सामावतो. अर्थ सिमीत शब्द हा भाषेचा गुलाम आहे. उलट असीमार्थ शब्द हा सर्व बंधनापासून मुक्त आहे. तो सार्थ आहे. त्याची स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणजे तुमची खरी अभिव्यक्ती आहे. त्यातच तुमच्या स्वस्वरूपाचे दर्शन आहे. तुम्हीच शब्दरूप होऊन असीमतेने प्रगटा. ज्यावेळी तुम्ही अर्थबध्द शब्दांनी तुमचे विचार व्यक्त करता, त्यावेळी शब्दांच्या बंधनांनी जखडून टाकलेले तुमचे सीमाबध्द रूप प्रगटत असते, आणि त्यालाच तुम्ही स्वत:चे स्वतंत्र व्यक्तीमत्व म्हणून मानत असता. म्हणून व्यक्तीमत्व हे नेहमी सीमीतच असते. स्वत:चे असीम, अव्यक्त स्वरूप त्यातून व्यक्त होत नाही. मग या सीमाबध्द शब्दांची फोलकाटे पुन्हा पुन्हा का उफणता? असीमार्थ शब्द म्हणजे तुमचे अबोलणे बोल होत. त्यातून तुमचे अव्यक्तीमत्व (आत्मस्वरूप) ओसंडत असते.
Posts
Showing posts from March, 2020
- Get link
- X
- Other Apps
आत्मस्वरूप भारवाहू ज्ञान उठ , अज्ञान निद्रेतून जागा हो , ‘‘ उत्तिष्ठत , जाग्रत प्राप्य वरान्निबोधत ‘‘. जा ते तुला स्वतंत्रतेचे महान ऐश्वर्य तुझ्याच ठाई कसे आहे ते दाखवून देतील. सद्गुरुंना शरण जा. ज्याला तू ज्ञान म्हणत आहे ते ज्ञान नव्हे. वेगवेगळ्या ग्रंथांतून आणि जगातून तू जे ज्ञान मिळविलेले आहे , ते ज्ञान म्हणजे तुझी कमाई आहे. त्या कमाईच्या मागे तू लागून ती अधिक वाढावी यासाठी खटपट करुन राहिलेला आहेस. असे कितीही जरी या ज्ञानाच्या कणांना तू गोळा करत बसलास तरी ते काय कामाचे ? ते नुसतेच ओझे! ते शिरावर किती दिवस तू बाळगत राहणार. तुला वाटते हे ज्ञान अधिक अधिक गोळा करील , अधिक अधिक ज्ञानसंपन्न होईल. सर्व जगामध्ये अलौकिक विव्दान म्हणून मी गाजेन , पण बाबा अरे , तू या तुझ्या डोक्यावरच्या ओझ्यात अधिकाधिक भर पाडून राहिलेला आहेस. जितके जितके हे ज्ञान वाढवशिल तितका तितका तू अलौकिक ओझेवाला म्हणून गाजशील. ज्ञान मिळविणे आणि ते जतन करुन ठेवणे ही एक हमालीच आहे. त्या ज्ञानाला वाहणारा तू एक गुलामच आहेस. ती तुझ्या डोक्यावरची ज्ञानाची पेटी , तिचा भार तुला उमगत...
- Get link
- X
- Other Apps
आत्मस्वरूप विचार तुझ्या ठाई जे नाना विचार उत्पन्न झालेले आहेत त्यांचा तू गुलाम आहेस. तुझ्या ठिकाणी ज्या नानात - हेच्या कल्पना उत्पन्न झाल्या आहेत त्यांचा तू गुलाम आहेस. तुझ्या ठिकाणी जे नानात - हेचे स्वभाव प्रगटतात त्यांचा तू गुलाम झालेला आहेस. अरे ते तुझ्याच पोटी निर्माण झालेले आहेत. त्या सर्वांचा तू गुलाम झाला आहेस. तुझ्या भावभावना , तुझे नानात - हेचे विचार , तुझ्या नानात - हेच्या कल्पना , तुझ्या नानात - हेच्या प्रवृत्ती आणि भीती यांचा तू गुलाम झालेला आहेस. या गुलामगिरीतून तू केव्हा मुक्त होशील ? ज्याला तू स्वातंत्र्य समजत आहे , ज्याला तू स्वतंत्रता म्हणत आहेस , ती स्वतंत्रता नव्हे. ज्याला तू स्वतःचे व्यक्तिमत्व म्हणवून घेत आहे , तू म्हणजे त्या व्यक्तिमत्वाची एक गुलामगिरी आहे. तू त्या व्यक्तिमत्वाचे स्वतःचे असलेले निराळेपण ओळखत नाही. तू त्या कल्पनांचा , विचारांचा , भावभावनांचा , त्या स्वभाव वैशिष्ट्यांचा किंकर आहेस , दास आहेस , बटिक आहेस. त्यांच्यापासून तू सुटला नाहीस , त्यांच्यापासून तू मोकळा झालेला नाहीस , तुला तुझे स्वतंत्रपण उमगलेले नाही. तू यांच्य...
- Get link
- X
- Other Apps
१. आत्मस्वरूप वृत्ती आणि व्यक्तिमत्व त्या नानात - हेच्या वृत्तींना निवृत्त करुन खरा निवृत्तीनाथ तू कधी होशील ? तुला या वृत्ती ज्या ठिकाणी निवृत्त होतात त्या स्वरुपाची ओळख कधी होईल ? त्या तुझ्या स्वरुपरुपाचे ज्ञान होऊन तू ज्ञानेश्वर या पदवीला कधी प्राप्त होशील ? बाबारे , थोडा विचार कर. जे तुझ्या ठिकाणी सतत उत्पन्न होते आहे , जे तुझ्या ठिकाणी पूर्वी उत्पन्न झाले आणि पुढेही सतत उत्पन्न होणारच आहेत. ते तुझ्यामध्येच लय पावत असते , या सत्याचा तू कधी विचार करशील ? जे जे प्रवृत्त झालेले आहे , निर्मितीक्षम जे जे काही आहे ते ते अखेर तुझ्यामध्ये विलय पावणारे आहे. अखेर ही प्रवृत्ती निवृत्त होत असते , असा तू निवृत्तीनाथ आहे! तू स्वतःचा विचार कधी करशील ? या सात्विक , राजस , तामस अशा गुणांपासून तुझा स्वभाव घडलेला आहे. त्या तुझ्या व्यक्तिमत्वापेक्षा तुझे खरे स्वरुप कसे वेगळे आहे , ते तू केव्हा ओळखशील ? तुझ्याच ठाई हा स्वभाव प्रगटलेला आहे. तुझ्याच ठाई हे नाना विचार प्रगटलेले आहेत. तुझ्याच ठायी या ज्या नाना कल्पना प्रगटल्या आहेत. तुझ्याच ठाई हे तुझ्या विषयीचे नानात...
- Get link
- X
- Other Apps
१. आत्मस्वरूप मोक्ष मेल्यापाठी आम्हांसी होईल। ऐसे जे म्हणतील अतिमुर्ख।। दीप गेल्यावरी कैसाजी प्रकाश। झाकाझाकी त्यास कासयासी।। जंववरी देह आहे तंववरी साधन। करूनियां ज्ञान सिध्द करा।। गृह दग्ध न होता शिंपीजे उदक। शेखी तो निष्टक काय कीजे।। आहे मी हा कोण करावा विचार। म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा।। आहे मी हा कोण? याचा करावा विचार. अरे गृहस्था तू कसला विचार करीत आहेस? या ठिकाणी एकटा एकटा बसून तू कोणाचे ध्यान करीत आहेस? तू कशाचे चिंतन करीत आहेस? तू कोठल्या तीर्थाला जाण्याचा विचार करीत आहेस? कोणाची पुजा अर्चा तू करीत आहेस? तू कशाचा विचार करुन राहिलेला आहे आणि कशासाठी हा एकांतवास पत्करलेला आहे? या एकांतामध्ये तू कशाची चिंता, कशाची काळजी करतो आहेस? स्वतःची काळजी तू केली काय? स्वतःची चिंता तुला कधी पडली काय? नानात-हेचे जे तुझ्या सहवासामध्ये काही लोक आहेत, ज्यांना तू आपले किंवा परके मानतो; त्यांचा तू विचार करतो आहे का? पण बाबारे, यात तुझ्या ठिकाणी निर्माण होणा-याभावभावनांचा विचार तू कधी करशील? या तुझ्या ठिकाणी निर्माण होणा-या नाना कल्पनांचा विचार तू कधी करशील? या तुझ्या ठिका...