Posts

Showing posts from August, 2020
विश्रांती        विसावा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? आपल्या पंखाची फडफड तेवढी थांबवावी लागेल! म्हणून या सर्व ज्ञानाच्या, भावभावनांच्या, कल्पनांच्या, फडफडी तुम्ही थांबवल्या म्हणजे तुम्ही स्वतःच विश्रामस्थळ आहात. हे सर्व विचारसुद्धा तुमच्या शरीरामध्ये सामावले जातात. त्या स्थितीमध्ये सुद्धा यांना जागा नाही. म्हणून हीच खरी तुमची अखंड स्थिती. तुमचे पठण, श्रवण, मनन, ध्यान-धारणा, भजन-पूजन, तीर्थयात्रा, गमनागमन, नानात-हेचे जे व्यवहार आहेत; ते या भरा-यांसारखे आहेत. तुम्हाला अखेर यात शिणच येणार.      याचा परीणाम म्हणून अखेर थकणे अपरिहार्य आहे. तुमच्या नामसंकिर्णतेचा अभिमान, विद्वत्तेचा अभिमान, बहुश्रृततेचा अभिमान, आचार विचारांचा अभिमान, व्रत उपासनादिकांचा अभिमान, तपसाधनेचा अभिमान, योग तप इत्यादिंचा अभिमान, हा अभिमान अखेर श्रमरुपच ठरतो. यामध्ये विश्राम नाही. यामध्ये तो निर्विकल्प स्थितीचा सहज असा विसावा नाही. त्यासाठी अखेर या भरा-या, या मनाच्या भरा-या शांतच झाल्या पाहिजेत. जेव्हा हे भरारणे थांबणार तेव्हाच त्या शांत होतील . ते थांबवणे तुमच्याच...
ज्ञानपंख      अरे राजहंसा, हे विचारांचे, भावभावनांचे पंख तुला आहेत आणि त्यातून ज्ञान आणि भक्तीच्या भरा-या तू मारुन राहिलेला आहेस. या पंखांनी तू गगनाला गवसणी घालशील पण तुला स्वतःपर्यंत येण्यासाठी या पंखांची काही गरज आहे काय? एक भावपंख आणि दुसरा एक ज्ञानपंख उभारुन तू या आकाशात भरा-या मारुन राहिला आहेस. त्यामुळे दमून भागून अखेर तू काय मिळवतो? भरा-या मारुन दमला भागलास, थकलास की अखेर आपल्याच जागेवर येऊन बसतोस आणि आपले पंख आपल्याच शरीरात समेटून घेतो. तेव्हा तुला खरीखुरी विश्रांती मिळते. या पंखांना जेव्हा तू स्वतःतच आवरुन मिटवून घेतो, तेव्हाच खराखुरा तू विश्राम पावतो. जसा भरा-या मारण्याचा आनंद आहे तसा हा ज्ञानाचा, भक्तीचा, भावकल्लोळाचा आनंद आहे. पण या आनंदापेक्षा स्वतःच्या ठाईच असा हा शांत विश्रामभाव आहे की, ज्यामध्ये ते आनंद सुद्धा लय पावून जात असतात.      अशी ही आपली स्वतःची अखंड आत्मस्थिती आहे. या विचारांच्या, भावभावनांच्या भरा-यांनी आपण स्वतःला आकाशात कां झोकून देतो? जसे जसे हे पंख तुम्ही वेगाने हलवाल तसे तसे तुम्ही आकाशात भरकटत जाणार. पण त्या आकाशाला अंत...