१. आत्मस्वरूप


वृत्ती आणि व्यक्तिमत्व



त्या नानात-हेच्या वृत्तींना निवृत्त करुन खरा निवृत्तीनाथ तू कधी होशील? तुला या वृत्ती ज्या
ठिकाणी निवृत्त होतात त्या स्वरुपाची ओळख कधी होईल? त्या तुझ्या स्वरुपरुपाचे ज्ञान होऊन तू
ज्ञानेश्वर या पदवीला कधी प्राप्त होशील? बाबारे, थोडा विचार कर. जे तुझ्या ठिकाणी सतत उत्पन्न
होते आहे, जे तुझ्या ठिकाणी पूर्वी उत्पन्न झाले आणि पुढेही सतत उत्पन्न होणारच आहेत. ते
तुझ्यामध्येच लय पावत असते, या सत्याचा तू कधी विचार करशील? जे जे प्रवृत्त झालेले आहे,
निर्मितीक्षम जे जे काही आहे ते ते अखेर तुझ्यामध्ये विलय पावणारे आहे. अखेर ही प्रवृत्ती निवृत्त
होत असते, असा तू निवृत्तीनाथ आहे! तू स्वतःचा विचार कधी करशील? या सात्विक, राजस, तामस
अशा गुणांपासून तुझा स्वभाव घडलेला आहे. त्या तुझ्या व्यक्तिमत्वापेक्षा तुझे खरे स्वरुप कसे वेगळे
आहे, ते तू केव्हा ओळखशील? तुझ्याच ठाई हा स्वभाव प्रगटलेला आहे. तुझ्याच ठाई हे नाना विचार
प्रगटलेले आहेत. तुझ्याच ठायी या ज्या नाना कल्पना प्रगटल्या आहेत. तुझ्याच ठाई हे तुझ्या
विषयीचे नानात-हेचे संशय प्रगटलेले आहेत. तुझ्या बोलण्याची, चालण्याची ढब, तुझ्या स्वभावाचे
वैशिष्ट्य, तुझ्या नानात-हेच्या व्यसनांचे विश्लेषण तू स्वतःच कल्पनेच्या नेत्रांनी करुन राहिलेला आहेस
आणि त्यालाच तू स्वतःचे व्यक्तिमत्व असे नांव दिलेले आहे. पण तू हे जे व्यक्तिमत्वाचे स्तोम धारण केलेले आहे, त्या तूलाचतू कधी ओळखशील? हे जे तुझे भासमान व्यक्तित्व आहे ते त्या चिरंतनअविनाशी अशा अव्यक्तिमध्ये लय पावणारे आहे. त्या तुझ्या अव्यक्तत्वाला तू केव्हा ओळखशीलस्वतःवर नाना व्यक्तिमत्वांची कल्पना तू करुन बसलेला आहे. या कल्पना बाजूला सारुन स्वतःचे खरे व्यक्तिमत्व तू कधी ओळखशील?

Comments

Post a Comment

Popular posts from this blog