वास्तव ज्या ठिकाणी तुमच्या शरीराची, भावभावनांची उंची व्यर्थ ठरते आणि तुम्ही स्वतः संग्रहीत केलेल्या विचारांची उंची सुद्धा ज्या ठिकाणी व्यर्थ ठरते अशी ही ब्रम्हस्थिती आहे. तुमचा अभोगीपणा, भक्तपणा, ज्ञानीपणा, तुमचा अभिमान, या अभिमानाची उंची कुचकामी आहे. या स्थितीच्या ठिकाणी तिला काही किंमत नाही. ही अन्नरसासारखी पुष्टीदायक नाही तर बचनागासारखी प्राणघातक आहे म्हणून हा अभिमान नको. आपल्या सूर्यपणाचा अभिमान धरला नाही म्हणून तो का सूर्य नसतो? तो सूर्यच असतो. पूर्वीही होता. स्मरणाच्या कालीही होता आणि स्मरण नसते तरीही तो सूर्यच आहे. तसे तुमचे स्वाभाविक ब्रम्हपण आहे. हे शरीर असतानाही ते आहे आणि हे शरीर नसतानाही ते आहे. या मनाचा उदय झालेला असतानाही ते आहे. हा ज्ञानाचा विचार प्रगट झालेला असतानाही ते आहे आणि अज्ञानाची निवृत्ती झालेली नसली तरीसुद्धा ते आहे. आपण ब्रम्ह आहोत हे स्मरण केले म्हणजे ब्रम्ह होतो असे नव्हे. तर आधीपासूनच आपण ते असतो. शरीर जीवंत असले तरी आपण ब्रम्ह म्हणूनच आहोत. आपली चैतन्यता अविछिन्न, अपार, आणि ओतप्रोत अशी आहे. एका देशात, एकाच काली असणारी एकाच वस्तूत असणारी अशी ही स्थिती ...
Posts
Showing posts from January, 2021