अखंड स्थिती पण तुम्हाला हे माहिती नसते. तुम्ही स्वतःला म्हणत असता की, मी अर्जुन आहे. तुम्ही हे काही ओळखत नाही की, मीच श्रीकृष्ण आहे. तुम्ही स्वतःला शिष्य म्हणवता. परंतु तुम्ही हेच ओळखत नाही की सद्गुरुस्वरुप, आत्मस्वरुप हे मी स्वतःच आहे. सद्गुरुंची ती चूक नसते. तुमच्या ठाई ते सद्गुरु स्वतःला पाहत असतात. पण तुम्ही आपल्या ठाई त्या सद्गुरुला ओळखू शकत नाही. तुम्ही स्वतःला अर्जुन म्हणवता. तुम्ही स्वतःला काहीतरी नामरुपात्मक म्हणवता. उगीचच स्वतःचे एक काल्पनिक व्यक्तिमत्व उभे करता, जे व्यवहार कुशल आहे. परंतु परमार्थदृष्टीने त्याला काहीही किंमत नाही. खरोखर पाहता त्या परमोच्च स्थितीमध्ये काही शिल्लकच राहत नाही. ती स्थिती अखंड आहे, जागती आहे. क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला व्यापूनच भरलेली आहे. तुमच्या अंतरी प्रत्यक्ष प्रगटच आहे. त्या स्थितीमध्ये तुमचे हे व्यक्तिमत्व म्हणून, तुमचे हे माणूसपण म्हणून, तुमचे हे शरीर म्हणून, मन म्हणून, ज्ञान म्हणून, तुमच्या वृत्ती, भावना, कल्पना, अज्ञान हे काहीही नाही. हे तुमचे व्यक्तिमत्व तुमच्याच ठाई खरोखर नाही. तुमचे अर्जुनपणच...
Posts
Showing posts from June, 2020