एकरूपता हे सागरा, या वाऱ्यामुळे तुझ्यावर कितीही लाटा जरी उसळल्या, तरी त्यामुळे तुझे काय बिघडते? त्यामुळे तुझे काय कमी जास्त होते? त्यामुळे तुला कसले सुख आणि दुःख प्राप्त होते? या लाटांच्या कल्लोळामुळे तुझ्या सागरपणाला कसली बाधा होते? आणि गड्या या लाटांनी तरी तुला सोडून राहावे कोठे? त्यांना आधार तर तुझाच आहे. त्यामुळे कितीही उठू दे या लाटांना! तू तुझ्या सागरपणानेच रहा. स्वतःवर उठलेला लहरीपणाचा, चंचल मनाचा, हा खेळ तू सागरपणानेच पहा. त्या प्रत्येक लहरीत हे सागरा तू स्वतःच भरलेला आहेस. हा तुझा खेळ तूच मांडलेला आहे. तूच रंगवलेला आहे आणि तूच या लहरींच्या रुपाने स्फुरण पावून राहिलेला आहेस. स्फुरणे हा तर तुझ्या सत्स्वरुपाचा स्वभावच आहे. मग ते स्फुरणे तू आपल्याच स्थितीत स्थित असताना खुशाल भोग. भक्तपणाने भोग किंवा देवपणाने भोग. स्वतः तुझ्या विश्वरुप लहरी आणि तू यांच्यात यत्किंचीतही भेदबुद्धी न धरता दीनपणानी आपल्या ऐश्वर्याचा उपभोग घे. कारण विश्वरुपाने तूच स्फुरलेला आहे आणि ते तुझ्याशी एकरुपच आहे. समाप्त
Posts
- Get link
- X
- Other Apps
वास्तव ज्या ठिकाणी तुमच्या शरीराची, भावभावनांची उंची व्यर्थ ठरते आणि तुम्ही स्वतः संग्रहीत केलेल्या विचारांची उंची सुद्धा ज्या ठिकाणी व्यर्थ ठरते अशी ही ब्रम्हस्थिती आहे. तुमचा अभोगीपणा, भक्तपणा, ज्ञानीपणा, तुमचा अभिमान, या अभिमानाची उंची कुचकामी आहे. या स्थितीच्या ठिकाणी तिला काही किंमत नाही. ही अन्नरसासारखी पुष्टीदायक नाही तर बचनागासारखी प्राणघातक आहे म्हणून हा अभिमान नको. आपल्या सूर्यपणाचा अभिमान धरला नाही म्हणून तो का सूर्य नसतो? तो सूर्यच असतो. पूर्वीही होता. स्मरणाच्या कालीही होता आणि स्मरण नसते तरीही तो सूर्यच आहे. तसे तुमचे स्वाभाविक ब्रम्हपण आहे. हे शरीर असतानाही ते आहे आणि हे शरीर नसतानाही ते आहे. या मनाचा उदय झालेला असतानाही ते आहे. हा ज्ञानाचा विचार प्रगट झालेला असतानाही ते आहे आणि अज्ञानाची निवृत्ती झालेली नसली तरीसुद्धा ते आहे. आपण ब्रम्ह आहोत हे स्मरण केले म्हणजे ब्रम्ह होतो असे नव्हे. तर आधीपासूनच आपण ते असतो. शरीर जीवंत असले तरी आपण ब्रम्ह म्हणूनच आहोत. आपली चैतन्यता अविछिन्न, अपार, आणि ओतप्रोत अशी आहे. एका देशात, एकाच काली असणारी एकाच वस्तूत असणारी अशी ही स्थिती ...
- Get link
- X
- Other Apps
ऐक्यभाव एक नदी पहाडावरुन खळखळत खाली उतरली. त्यावेळी त्या पहाडावरचे एक रोपटे त्या नदीला हसते आणि म्हणते, बाई, तू आकाशाकडे जाण्याऐवजी या जमिनीकडे कशासाठी जातेस? तेव्हा ती नदी खळाळत हसून म्हणते, मी माझ्या सागरपणाकडे जाते आहे! आणि हे रोपट्या तू आकाशाकडे का पाहतोस? रोपटे म्हणाले, मला उंच व्हायचे आहे. मोठे व्हायचे आहे. तुझ्यासारखे एखाद्या सागरात मिळून जायचे नाही. स्वतःचे अस्तेपण मला गमवायचे नाही. मी हळूहळू वाढेन, उंच होईन, या शिखरावरचा वृक्ष असल्याने मी या शिखराहूनही उंच होईन. तरीही मी वाढेन, उंच उंच आकाशाकडे जाऊन या जगाकडे पाहेन. मग सर्व जग निव्वळच ठेंगणे असेल आणि मी एक महान वृक्ष असेल. आकाशासारखा मी सर्वांहून उंच आणि सर्वांपेक्षा अलिप्त असा होईन. त्या सरितेने आपल्या आसवांचे दोन तुषार त्या रोपट्यावर शिंपडून ती अंतर्मुख होऊन आपल्याच नादात गुणगुणू लागली. ‘‘जा माझे अस्तेपण लोपून, नामरुपी घट्ट तू नामरुप हो‘‘. माझे दोन किना-यांनी बांधले गेलेले हे नदीरुपही शिल्लक न राहो आणि नदी हे नावही शिल्लक न राहो. मी माझ्या या जळासकट माझ्या सागरस्वरुपाशी एकरुप असो. सागरपणानेच मी अखंड असो आणि खरेच आहे. के...
- Get link
- X
- Other Apps
अभंग स्वरूप एकदा तुम्ही जगाला पाहत असता आणि लगेच आपल्या उंचीला पाहत असता. दोहोंमध्ये तुम्हाला भेद दिसतो. या जगाचे अंतरंग स्वरुप तुम्ही झालाच नाही, म्हणून तुम्हाला तुमची उंची ही जाणवते आहे. या उंचीची जाणिव मिळवून घ्या आणि त्या अंतरात्म्याशी, त्या जगद्अंतराशी, त्या स्वरुपाशी अभंग एकतेचा आनंद तुम्ही शिल्लक राहू देवू नका. तो ही आपल्या ठाई तुम्ही मिळवून घ्या. त्या निर्विकल्प स्थितीमध्ये नाही उंचपणा, नाही ठेंगूपणा, नाही जग, नाही जगामध्ये उंच असणारी एखादी व्यक्ती. त्या ठिकाणी कोणताही संकल्प-विकल्प नाही. अशी ती निर्विकल्प स्थिती आपली आपल्याच ठिकाणी जेव्हा ब्रम्हपणाने स्फुरते तेव्हा तुमच्यासकट सर्व विश्र्वाचे नामरुप नाहिसे होते. त्या नामरुपाच्या आतमध्ये दडलेले तुमचे स्वस्वरुप हेच तुमचे विश्व होऊन गेलेले असते. हाच चैतन्याचा विलास होय. त्याकाली जग हे जग न वाटता ब्रम्हरुपाने चैतन्याचा विलास म्हणूनच आणि त्याच्याशी आपली स्वाभाविक एकता राहूनच आपल्याला प्रगट असते. या ठिकाणी तुम्ही पाहणारे नाही आणि तुम्ही ज्याला पाहता अशी एखादी दृष्य वस्तुसुद्धाशिल्लक राहिलेली नाही. दृष्य आणि ते पाहणारा देखण...
- Get link
- X
- Other Apps
जाणिव सद्विचारांचा प्रभाव आपल्यावर असा पडतो की त्यामुळे आपण विचारांचे खरोखरच अत्युच्च शिखर गाठतो. सद्विचारांनी आपण फार फार उंच होतो. आपली ही उंची म्हणजे आपली स्वाभाविक स्वस्वरुप स्थिती नव्हे. तो आपल्याच पोटी निर्माण झालेला विचारांचा अभिमान असतो. त्याला विचारांचा किंवा ज्ञानाचा अभिमान असे म्हटल्या जात असते. आपल्या ब्रम्हपणाची जाणिव हेच त्याचे अत्युच्च शिखर असते. या जाणिवेचे प्रकाशक तुम्ही असता. ही जाणिव, ही ब्रम्हपणाची जाणिव, हे प्रकाशित करणारे ते तुम्ही असता. ही जाणिव म्हणजे तुम्ही नव्हे. म्हणून तुमच्या ठिकाणी प्रगट असणारी ‘मी ब्रम्ह आहे‘ ही जाणिव, त्या जाणिवेलाही प्रकाशित करणारे ते तुम्ही असता. ही जाणिव तुम्ही प्रकट केली. ही जाणिव तुम्हीच तुमच्यामधे लय करुन टाकणारे आहात. अशारितीने तुम्ही या जाणिवेचे सर्व समर्थ असे जनक आहात. तुम्ही ब्रम्हस्वरुप झालात. महतो महिमान असे महानाहूनही महान असे झालात. ईश्वर, देवदेवता, सर्व प्राणीमात्र खालीच राहिले. खुजेच ठरले तरी या ठिकाणी ती उच्चता तुम्हाला पचवता आली नाही, स्वतःमध्ये जिरवून टाकता आली नाही. म्हणून हे उच्चतेचे एक अजिर्णच तुम्हा...
- Get link
- X
- Other Apps
विचारांची उंची येथे आहे मी हा कोण? याचा करावा विचार असे ते म्हणतात. सद्गुरू आपल्याला विचार करा असे म्हणतात. ध्यान-धारणा करा, पूजा-अर्चा करा, भक्ती-भजन करा, तिर्थयात्रा, व्रत, उपवास करा असे ते म्हणत नाहीत. तर विचार करा असेच ते म्हणतात. म्हणजे विचाराने आपली आपल्याला ओळख करुन घ्या. आपले रुप आपण आरशामध्ये पाहतो. आपण काळे का गोरे, नकटे का चांगल्या नाकाचे हे आपण आरशामध्ये पाहून आपल्याला उमगतो. नंतर मग तो आरसा आपण बाजूला ठेवून देतो. त्याप्रमाणे विचाराने तुम्ही स्वतःला ओळखा नंतर तो विचार आरशाप्रमाणे बाजूला करता येत नाही तर स्वतः मध्येच मिळवून घ्या. खलील जिब्रानला आपल्या भटकंतीमध्ये एक भटका भेटला. तो प्रवासी खूपच उंच होता, त्या भटक्याला वाटायचे की या जगातील सर्व प्राणिमात्र फार फार खुजे आहेत आणि मी फार फार उंच आहे. हे माझ्या कमरेपर्यंतही येऊ शकत नाहीत एवढे ते खुजे आहेतदिवसेंदिवस तो अधिकच उंच झाला. सर्व वृक्षादिकसुद्धा त्याच्यापेक्षा ठेंगणे ठरले. त्याहूनही तो अधिक उंच झाला. मेघादिकही त्याच्यापेक्षा खालीच राहिले. माझी तुम्हाला हीच विनंती आहे की तुम्ही असे उंच होऊ नका, तसेच खुजेसु...
- Get link
- X
- Other Apps
अभिमान कुणी वैराग्याचा, कुणी भक्तीचा, कुणी ज्ञानाचा अभिमान धरतो. कुणी योगमार्गाचा, कुणी भक्तपणाचा, नानात-हेचे अभिमान नाना लोक धारण करतात. ते जो आनंद त्यातून लुटत असतात तो त्यांच्या अभिमानाचा आनंद असतो. तो त्यांच्या ख-या स्थितीचा आनंद नसतो. कीर्तन करत असताना, कीर्तन ऐकत असताना जो आनंद प्रगटत असतो तो त्या कीर्तनाच्या स्थितीचा आनंद असतो. आत्मस्थितीच्या ठिकाणी तो नाही. तो आत्मस्थितीचा आनंद या सर्व आनंदाचे माहेरघर आहे. शब्द ऐकण्याची जरुर नाही. बोलण्याची जरुर नाही. कोणता स्पर्श घडण्याची जरुर नाही. कोणता रस चाखण्याची गरज नाही. कोणते रुप पाहण्याची गरज नाही. रुप लावण्य दाखवण्याची गरज नाही कोणत्या गंधाची सुद्धा त्याला गरज नाही. असा शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध यांची अपेक्षा न करता जो आनंद आपल्या अंतरी अखंड स्थित आहे, असा तो आनंद आहे. तो आनंद या कीर्तनावाचून, भजनावाचून, श्रवणभक्तीवाचून अंगचाच आहे. त्यासाठी आपल्याला योगाभ्यासाची गरज नाही. प्राण ब्रम्हांडाला नेण्याची गरज नाही. कारण तो आनंद ही एक आपली स्वाभाविक स्थिती आहे. तो प्राप्त करायची गरज नाही कारण आपणच आनंदरुप आहोत. आपण आनंदरुप कसे आ...